Type Here to Get Search Results !

घरे फोडणारे अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

घरे फोडणारे अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

हिंगणघाट शहरात एकाच रात्री चार घर फोडण्यात आले होते,दोन्ही चोरटे नागपूरातील

डिबी पथकाची कारवाई

            वर्धा
जिल्हा प्रतिनिधी/सचिन महाजन

   हिंगणघाट शहरात रात्रदरम्यान संत तुकडोजी वार्ड, हिंगणघाट येथे एकाच रात्री घर फोडी मध्ये उमेष उत्तम फुलकर,सिद्धार्थ काशिनाथ गायकवाड, राणी विलास झाडे व दिपक गायधने यांच्या घरी अज्ञात चोरटयांने घरफोडया केल्या असुन त्याबाबत पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे घरफोडीचे ३ गुन्हे दाखल करण्यात आले.
     पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील पो.हवालदार शेखर डोंगरे यांचे डी.बी. पथकाला पो.नि. संपत चव्हाण यांनी माहीती देवुन रवाना केले.सदरची माहीती मिळताच डि बी पथककाचे पो.हवालदार शेखर डोंगरे यांचे पथक हिंगणघाट परिसरात रवाना होवुन आरोपी व चोरीचा मालाचा शोध घेत असता  पथकांनी आपले नेटवर्कचा फायदा घेत माऊली पार्क, नागपुर रोड, हिंगणघाट येथे पोहचुन दोन संशयित इसमांना ताब्यात घेवुन त्यांची बारकाईनेे व कसुन चोकशी केली असता त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेल्या मालापैकी नगदी रक्कम,सोन्याचे दागिणे व घडयाळ जप्त करून त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली. त्यांचा  विद्यमान  कोर्टातुन ३ दिवस पि.सि.आर. प्राप्त झाल्याने त्यांच्याकडुन पि.सि.आर. काळात पोलीस स्टेशन ला दाखल असलेल्या तिन्ही गुन्हयाचा चोरीस गेलेला माल सोन्याचे व चांदीचे दागिणे तसेच नगदी रक्कम असा एकुण किंमत ४९,९६० रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्हयात अटक करण्यात आलेले आरोपी नामे राहुल कमल माणिकपुरे वय २८ वर्ष  रा.योगी अरविंद नगर गली क्र.१० यषोधरा चोक नागपूर व दुसरा नितेष अषोक गिरावकर वय २० वर्ष रा. गिट्टी खदान,आखरी बस स्टाफ, झोपडपट्टी नागपूर,यांच्या विरूद्ध नागपुर जिल्हा,भंडारा जिल्हा व चंद्रपुर जिल्यातील विविध पोलीस स्टेशनला सदर आरोपींता विरूद्ध चोरी,जबरी चोरी व घरफोडीचे ४० ते ४५ गुन्हे दाखल असुन ते आरोपी पोलिस स्टेशन रेकाॅर्ड वरील अट्टल गुन्हेगार म्हणुन नोंद आहे. 
       सदरची कामगीरी प्रषांत होळकर पोलीस अधीक्षक वर्धा, यषवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा,दिनेष कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि.संपत चव्हाण, पोलीस स्टेषन, हिंगणघाट, यांचे मार्गदर्षनात डि. बी. पथकाचे पो.हवा. षेखर डोंगरे,निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विषाल बंगाले, सचिन भालशंकर यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies