शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आडव्या अवस्थेत विद्युत पोल पडुन
विद्युत पुरवठा १५दिवसापासून खंडित
वणी तालुक्यातील नांदेपेरा सोनापुर शेत शिवारात असलेल्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आडव्या अवस्थेत विद्युत पोल पडुन असलेल्याची तक्रार दिली असता नांदेपेरा सोनापुर शिवारातील शेतकऱ्याचा १५दिवसापासून विद्युत पुरवठा खंडित करून ठेवल्याने सध्या पाऊसाने दांडी मारल्याने कापूस पराटीलापाणी देण्याची आवश्यकता असल्याने विद्युत विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्याकडून विद्युत विभाच्या प्रति रोष व्यक्त केला जात आहे. या परिसरातील शेतकऱ्याचे शेतामध्ये असलेल्या पराटीला विद्युत पुरवठा खंडित असल्याने आडवे पडलेले पोल उभे करून विद्युत पुरवठा सुरू करू देण्याची मागणी नांदेपेरा सोनापुर शिवारातील शेतकऱ्यांकडून होत आहे