मारेगाव पोलिसांनी दुचाकी चोरट्याच्या आवळल्या मुसक्या
प्रतिनिधी/ पंकज नेहारे
मारेगाव शहरातील दोन दुचाकी अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्या घटना दोन महिन्यापुर्वी घडली असल्याने मारेगाव पोलीसांनी चोरट्याच्या शोधत असताना चोरी गेलेल्या त्या दुचाकी चोरांना पकडण्यामध्ये मारेगाव पोलिसांना यश आलेले असून हे वाहनचोर सध्या यवतमाळातील जेलमध्ये हवा खात आहे.
मारेगाव शहरातील नगरपंचायतच्या मागे असलेल्या भोगेकर यांची दुचाकी भर दुपारी घरासमोरून दुचाकी हिरो स्प्लेण्डर क्र.MH२९- AJ ६५६४ ही २०/५/२०२१ किंमत ४०हजार रुपये चोरी गेली होती. तर दुसरी दुचाकी प्रभाग क्र. १७ मधून तलाठी यांच्याकडे कामासाठी आलेले वागदरा ता. मारेगाव येथील सोनेराव अय्या टेकाम यांची हिरो होंडा MH२९ K १०१ किंमत १०हजार रुपये या चोरीला गेल्या होत्या. तसेच अशाचप्रकारे वाहने पांढरकवडा
परिसरातही गेल्या होत्या. पांढरकवडा पोलिसांनी याविषयी कारवाई करीत रा. साखरा ता. घाटंजी येथून ५ संशयित आरोपीना अटक केली होती. या ५ संशयित आरोपीनी वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा, यवतमाळ, आदीलाबाद येथून २० दुचाकी चोरल्याचे कबूल दिली. मारेगाव पोलिसांनी चौकशी सुरू केली असता यातील दोघांनी मारेगाव येथून दोन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यातील सागर तुळशीदास भेंडारे, वय२४ आणि विजय विलास ढोके २६, या दोघांना मारेगाव पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले त्यांच्याकडून दोन दुचाकी चोरल्या असल्याची कबुली दिली. संशयित आरोपींना यवतमाळ येथील जेलमध्ये पुन्हा पाठवण्यात आले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अमोल चौधरी, जमादार आनंद अलचेवर, सुलभ उईके, बंटी मेश्राम यांनी केली.