अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून भ्रूणहत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा
भिलीस्थान टायगर सेनेची तळोदा पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातू केली मागणी
प्रतिनिधी/सचिन मेश्राम
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अवैध्यरित्या भ्रूणहत्या करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा करा अशी मागणी भिलीस्थान टायगर सेनेने पोलीस निरीक्षक यांना मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार,दिलीप वळसे पाटील गृहमंत्री , जिल्हाधिकारी नंदूरबार, पोलीस अधिक्षक नंदुरबार, पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,ब्राम्हणपूरी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार केले व गर्भवती करून अवैध्यरित्या भ्रूणहत्या केल्याची घटना घडली आहे.सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो.घटनेतील संशयीत आरोपी पंकज मंगा पाटील व त्याला मदत करणारे अंबालाल पाटील ,शांत्या पाटील , बु-या शांता पाटील व भ्रूणहत्या संबंधीत डाॅक्टर व नर्स यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतीबंधक कायदा,पोक्सो , भ्रूणहत्या व इतर विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करून सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी.सदर घटनेत पोटाची खळगी भरण्यासाठी शहादा येथील ब्राह्मणपूरी येथे आलेल्या गरीब आदिवासी कुटुंबातील ११ वर्षाच्या अल्पवयीन मुलींवर वारंवार बलात्कार केला असून संशयीत आरोपीने आपले पाप लपविण्यासाठी पाच महिन्याचा अवैध्यरित्या गर्भपात घडवून भ्रूणहत्या केली आहे.मुख्य आरोपीसह त्याला मदत करणारे आरोपी डाॅक्टर व नर्स हे या प्रकरणात तेवढेच दोषी आहेत.आदिवासी समाजाच्या मुली व महिलांचा असहायतेचा व गरीबीचा गैरफायदा घेत अत्याचार केल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे कायमचे थांबविणे अत्यंत आवश्यक आहे.म्हणून
सदर घटनेतील सर्व आरोपींना तात्काळ अटक करून सदर प्रकरण जलद न्यायालयात चालवण्यात यावे व आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी.हीच नम्र विनंती.अन्यथा आदिवासी समाजातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.याची नोंद घ्यावी. अशी मागणी भिलीस्थान टायगर सेनेची तळोदा पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातू मागणी केली केली आहे.
यावेळी उपस्थित. राजु प्रधान तालुका अध्यक्ष BTS, दिलीप पावरा(तालुका प्रवक्ता BTS,योगोश पाडवी शहर अध्यक्ष BTS, हितेश गुलाले (AC अध्यक्ष BTS, कैलाश धानका शहर उपध्यक्ष BTS,मुन्नाधानका माजी. सचिव BTS, सूरज धानका सदस्य BTS), अर्जुन पावरा शाखा अध्यक्ष रेवानगरBTS, गोपाल पावरा शाखा उपाध्यक्ष रेवानगर BTS, राहुल पावरा शाखा सल्लागार रेवानगर BTS, बियलाल पावरा शाखा प्रवक्ता रेवानगर BTS, राजू धानकासदस्य BTS, दयानंद दादा सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.