अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद,नवी दिल्ली मारेगाव शहराध्यक्षपदी निलेश आत्राम व सचिव पदी सोनू गेडाम
मारेगाव वार्ता
पंकज नेहारे
आदिवासी समाजातील वंचित घटक अजूनही न्याया पासून कोसो दूर असताना त्यांना समाजातील मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मारेगाव शहरातील युवा नेतृत्व निलेश आत्राम यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या मारेगाव शहराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
मारेगाव शहर हा आदिवासी बहुल शहर असून आदिवासी समाजातील बहुतांश कुटुंब शासकीय योजने पासून कोसो दूर असताना त्यांना शासकीय योजनेच्या व समाजातील मुख्य प्रवाहात आणण्या करीता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले अखिल भारतीय विकास परिषदेचे जिल्हा अध्यक्ष नरेश गेडाम यांच्या आदेशानुसार मारेगाव तालुका अध्यक्ष सुमित गेडाम यांनी निलेश आत्राम व सोनू गेडाम नियुक्ती पत्र देवून शुभेच्छा दिल्या . यावेळी उपस्थित अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मारेगाव तालुका उपाध्यक्ष राजु सिडाम व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. नियुक्तिचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.