मारेगाव तालुक्यात आज सहा पॉझिटीव्ह
- मारेगाव शहर निरंक
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव चढऊतारात आहे.कोरोना संसर्गाने आज मंगळवारला डोके वर काढीत तालुक्यात सहा जनांना बाधीत केले.मात्र मारेगाव शहराला यातुन वगळत भोपळा दिला.
मारेगाव तालुक्यातील कोरोना संसर्ग बाधितांच्या आकड्यात कमीजास्त करीत पाय पसरने सुरु ठेवून तालुक्यात सहा जनांना बाधीत केले.मात्र शहराची स्थिती एकदम समाधानकारक ठेवत एकही विषाणु बाधीत रुग्ण नाही.या दिलासादायक वृत्ताने तुर्तास समाधान व्यक्त केले जात आहे.
दरम्यान ग्रामिण भागात तपासणी आणि लसीकरण जोमात सुरु असतांना नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प दिसतो आहे.तालुक्यातील प्रामुख्याने ग्रामिण भागातील सहा जनांना बाधीत केले असले तरी बरे होण्याचे प्रमाण २३ आहे तर अँक्टिवची संख्या रोडावत ८४ वर आली आहे.नागरिकांनी स्वत:ची काळजी घेत सुरक्षित राहण्याचे आवाहन प्रशासना कडुन करण्यात येत आहे.