Type Here to Get Search Results !

सभापती संजय पिंपळशेंडे यांची भाजपा वणी विधानसभा प्रमुख पदी निवड

सभापती संजय पिंपळशेंडे यांची भाजपा वणी विधानसभा प्रमुख पदी निवड

  जिल्हा प्रतिनिधी/रोहन आदेवार

वणी :वणी पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष सभापती तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष, संजय पिंपळशेंडे यांची भारतीय जनता पक्षाच्या वणी विधानसभा प्रमुखपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. हि निवड जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा व वणी विधानसभेचे कर्तव्यदक्ष आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या उपस्थितीत एका बैठकीत करण्यात आली.
 यावेळी नगराध्यक्ष तथा भाजयुमोचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तारेन्द्र बोर्डे,जिल्हा सरचिटनीस राजुभाऊ पडगीलवार, रवी बेलुरकर, दत्ताजी रहाणे, जिल्हा सचिव शंकर लालसरे, किशोर बावणे, प्रतिक खुलसंगे जिल्हाध्यक्ष आदिवासी आघाडी,गजानन विधाते तालुका अध्यक्ष, राकेश बुग्गेवार शहर सरचिटणीस, जि.प.सदस्य बंडुभाऊ चांदेकर,नितीन वासेकर जिल्हा सरचिटणीस व सर्व शहर व तालुका, युवा मोर्चा, महिला आघाडी, सोशल मीडिया पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वणी विधानसभा क्षेत्रात भाजपाची पकड मजबुत असुन येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा आगामी निवडणुका लक्षात घेता वणी पंचायत समिती चे कर्तव्यदक्ष सभापती संजय पिंपळशेंडे यांची वणी विधानसभा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे श्रेय माजी केन्द्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराज अहीर,माजी पालक मंत्री मदन येरावार, वणी विधानसभेचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीनजी भुतडा यांना देतात. या निवडीमुळे वणी-मारेगाव व झरी या विधानसभा क्षेत्रातील भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies