देवळी येथील युवकाचा ट्रॅक्टर खाली दबल्याने जागीच मृत्यू.....
रस्त्याच्या बाजूला असलेल्या दहा फूट खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी झाल्याने घडली दुर्घटना....
गंगापूर तालुक्यातील देवळी येथील एका बावीस वर्षीय युवकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला खोदलेल्या खड्ड्यात पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत ट्रॅक्टरखाली दबल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना मंगळवारी रात्री घडली असून बापू रमेश तायडे (वय २२) रा.देवळी ता.गंगापुर असे अपघातात ठार झालेल्या युवकांचे नाव असून गाजगाव-गवळीशिवरा रोडवरील वामन चौकातून देवळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शेतातून नांगरणी करून घरी जातांना रस्त्याच्या कडेला भल्या मोठ्या खोदलेल्या खड्ड्यात सदरील टॅक्टर चालकाचा ताबा सुटल्यावर टॅक्टर पलटी झाला अन् त्यांचा अंत झाला रात्रीच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे.
शिल्लेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून ठाण्यात) अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.लासुरस्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर त्याच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. बापूच्या मृत्यूने देवळी गावावर शोककळा पसरली आहेत.