सरपंच-सचिवच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची आत्महत्या
गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील गोसाईटोला ग्रामपंचायतीत कार्यरत असणारे ४५ वर्षीय कर्मचारी संजय हिवकराज रंगारी यांनी आत्महत्या केली आहे. मृत रंगारी यांनी सरपंच, सचिव आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याच मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिट्टी मध्ये म्हटलं आहे. रंगारी यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे. मृत संजय रंगारी शुक्रवारी सायंकाळपासून बेपत्ता असल्याने. ते रात्री घरी न आल्याने कुटुंबातील सदस्यांनी संजय याचा सर्वत्र शोध घेतला असता मात्र शोध लागला नसल्याने काही संजय याचे
जवळचे मित्र व नातेवाईकांकडेही चौकशी केली. मात्र त्यांचा काहीही पत्ता लागला नाही. पण काल सकाळी संजय यांच्या शेताच्या बाजूला राहणाऱ्या एका झाडाला शेतकऱ्याला त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेची माहिती संबंधित शेतकऱ्याने त्वरित मृताच्या कुटुंबीयांना आणि पोलिसांना दिली.
या घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेवून मृतकाची तपासणी यावेळी केली असता पोलिसांना मृताच्या खिशात एक चिट्ठी मिळाली आहे. यामध्ये गोसाईटोला ग्रामपंचायतील सचिव, सरपंच आणि अन्य ग्रामसदस्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं चिट्ठी मध्ये लिहिले आहे. संशयित आरोपीं यांनी संजय याला कामावरून काढण्याची धमकी दिली असल्याचे या चिट्ठी मध्ये नमूद करण्यात आलं आहे. पदावरून काढून टाकण्याच्या धमकीमुळे भितीमुळे संजय यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक अंदाज पोलिसांकडून देण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी वडीलांच्या फिर्यादीवरून सचिव, सरपंच आणि अन्य ग्रामपंचायत सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत