मारेगाव तालुक्याला आज कोरोना संसर्गाची मुक्ती
शहरात केवळ एक पॉझिटीव्ह
अँक्टिवचाही आकडा रोडावला
मारेगाव : सचिन मेश्राम
मारेगाव तालुक्यातील कोरोना संसर्गाचा स्तर कमी होतांनाचे चित्र आहे.बहुदा कोरोना मुक्तीकडे तालुक्याची वाटचाल सुरु असतांना तालुक्यातील ग्रामिण भागात आज बुधवारला एकही बाधीत रुग्ण नाही.मात्र मारेगाव शहरात एका पॉझिटीव्ह रुग्णाची नोंद प्रशासकीय दप्तरी झाली.आजच्या नाहीशा रुग्णाने तालुक्याला सुखद अनुभव मिळाला आहे.
मारेगाव तालुक्यातील पॉझिटीव्ह आकडेवारीचा लपंडाव कायम होता.मात्र आज आश्चर्यकारकरित्या शुन्य आकडेवारीने मारेगाव तालुका कोरोना मुक्तीकडे वाटचाल करित आहे.शहराला नको म्हणता एकास पॉझिटीव्ह करित नागरिकांना हलका धक्का दिला.दरम्यान रुग्णांचा आजचा दर शुन्यात जमा झाला आहे.त्यामुळे जनतेला सुखद अनुभव मिळतो आहे.
परिणामी,तालुक्यातील अँक्टिवचा आकडा रोडावत केवळ ६६ वर आला आहे.बरे होवुन घरी परतलेल्यात १९ जन आहेत.एकुणच आजच्या आकडेवारीने मारेगाव तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने वाटचाल करित असल्याचे सकारात्मक संकेत आहे.मात्र जनतेंनी गाफील न राहता नियम व अटीचे काटेकोर पालन करुन कोरोनास वेशीवर ठेवण्याचा प्रयत्न करावा अशी प्रशासनांने अपेक्षा व्यक्त केली आहे.