दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक २जण जागीच ठार १गंभीर जखमी
चिमूर - चिमूर कांपा मार्गावरील बीएमसी चौकात २ दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक दिल्याने २जण जागीच ठार झाले तर १ गंभीर जखमी झाला.
रविवार दि.२७जून सकाळी ११ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
चिमूर येथील इंदिरानगर परिसरात राहणारे ४८ वर्षीय अजय राऊत आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ एवाय ८७०८ ने कांपा वरून कामा निमित्ताने चिमूरला जात असताना.
मालेवाडा पुलावर काम करणारे दोन कामगार येत असताना मालेवाडा पुला जवळ दोन दुचाकीची समोरासमोर घडक झाल्याने शिवणी, मध्यप्रदेश येथील रहिवासी २४ वर्षीय सनी आरोवा व सिंदेवाही तालुक्यातील नाचनभट्टी रहिवासी २५ वर्षीय अतुल चौधरी हे आपल्या दुचाकी वाहन क्रमांक एमएच ३४/६४०९ ने चिमूर वरून कांपाच्या जोरदार धडक दिल्याने अजय राऊत व सनी आरोवा यांचा जागीच मृत्यू झाला, तर अतुल चौधरी हा गंभीररीत्या जखमी झाला असता त्याला तात्काळ चिमूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच चिमुर पोलिसांनी घटनास्थळी जावून घटनेची पाहणी करून घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले, घटनेचा पुढील तपास एपीआय मंगेश मोहोड व पोलीस उपनिरीक्षक अलिम शेख पुढील तपास करीत आहे.