Type Here to Get Search Results !

टाकळी येथील विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

टाकळी येथील विषप्राशन केलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

   जिल्हा प्रतिनिधी /रोहन आदेवार

मारेगाव: तालुक्यातील टाकळी(कुंभा) येथील मारोती चिरकूट खेवले(४०) यांनी दि. ११ जून सकाळी ९ वाजता दरम्यान आपल्या स्वतःच्या गोठ्यात विषप्राशन केले होते.
त्याला उपचारासाठी मारेगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. व त्यानंतर लगेच पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले होते. यवतमाळ येथे उपचार सुरू असताना आज पहाटे ३वाजता दरम्यान मारोती यांची प्राणज्योत मावळली.

मारोती हे त्यांच्या वडिलांची शेती करत होते व त्याने त्याच्या पेरणी च्या दिवशी स्वतःच्या गोठ्यात विषप्राशन केले. गेल्या वर्षी नापिकी झाल्याने घरच्यांकडून दिलेल्या माहितीनुसार  एक महिन्यांपूर्वी मारोतीच्या वडिलांचेही आजाराने निधन झाले. मारोतीच्या मागे आई पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies