आदिवासी महिला तलाठीला मारहाण करणाऱ्या नगरसेवकाला तात्काळ अटक करून कारवाई करा
आदिवासी संघटनेने शिरपूर उपविभागीय अधिकारी यांना दिले
शिरपूर अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली, रावण राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी महिला तलाठी ही रेती तस्करी करणाऱ्या नगरसेवक गौरव चौधरी यांच्या वाहनावर कारवाई करण्यासाठी गेली असता आदिवासी महिला तलाठीला मारहाण करणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करून तात्काळ अटक करून जल बंद करा या आशेचे निवेदन उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना देण्यात आले.
निशा पावरा गौण खनिज नियंत्रण पथकाची तलाठी असून त्याच्यावर नंदुरबार नगरपालिकेचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी मारहाण केली व जातीवाचक शिवीगाळ केली त्याचावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी व संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात वाळू ठेके सुरू असलेल्या ठेकामालक व जिल्ह्यातील नेते,पुढारी आणि अधिकाऱ्याचा संगत मतांनी टक्केवारी असलेल्यावर कार्यवाही झाली पाहिजे तसचे लॉकडाऊन असता जिल्हा बंदी असून देखील गुजरात राज्यातील वाळू नंदुरबार जिल्ह्यात तस्करी करण्याची सूट जिल्हा प्रशासनाने दिली नंदुरबार जिल्ह्याची वाळू नाशिक,मुंबई,पुणे अश्या ठिकाणी पोचवणाऱ्या वाळू माफियाच्या टोळीला राखण्यासाठी वादग्रस्त ठिकाणी आदिवासी कर्मचाऱ्यांची नेमणूक प्रशासन आणि राजकीय नेत्याकडून आदिवासी समाजावर हा अन्याय अत्याचार अनेक वर्षांपासून होत आहे यांवर बंदी आणा अन्यथा जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी समाज एकत्रित येऊन जण आंदोलन पुकारले अशी महाराष्ट्र सरकार आणि जिल्हा शासन,प्रशासनाला निवेदनातू सांगण्यात आले आहे.
यावेळे उपस्थित धुळे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष उमेश पावरा, अमर पावरा, तालुका अध्यक्ष (रावण राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य) तथा शिरपूर ता. सचिव, मंगलसिंग पावरा, तालुका प्रसिद्धी प्रमुख, सेवाघ पावरा (रावण राजे फाउंडेशन, शिरपूर तालुका उप) हिम्मत पावरा, सागर पावरा, पिंटू पावरा, कमलेश पावरा, अशोक पावरा, शुभम पावरा, राहुल पावरा, इत्यादि उपस्तिथ होते.