संत बाजीराव महाराज वृद्धाश्रम चिखलगाव स्तुत्य उपक्रम
वणी
प्रतिनिधी/ संजय नागपुरे
स्थानिक वणी शहरापासून किमान चार किमी अंतरावर असलेले मेघदूत कॉलनीच्या मागील लागून असलेले निसर्गरम्य अशा स्थळी संत बाजीराव महाराज वृद्धाश्रम खरोखरच जीवनाच्या वृद्धापकाळात बेसहारा लोकांस सहार्याचा आश्रयस्थान ठरण्यास वरदान ठरत आहे याबद्दल सविस्तर माहिती अशी की वृद्धाश्रम म्हणजे स्वर्गीय माजी आमदार श्री दादासाहेब नांदेकर त्यांचे सहकारी श्री शेलवडे साहेब, गरुड पाटील बोंडे , नंदाताई शेलवडे वसंत जिनिंगचे माजी अध्यक्ष तथा मुख्य सल्लागार सुनीलभाऊ नांदेकर, अध्यक्ष सुहासभाऊ नांदेकर व त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांच्या अथक परिश्रमातून उभे झालेले
हे जीवनदायी वृद्धाश्रम वणी शहरासाठी तथा तालुक्यातील वृद्धापकाळातील वृद्ध लोकांसाठी वरदान ठरत आहे. मेघदूत कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या या वृद्धाश्रमासाठी ९०० मीटर एवढ्या रस्त्याचे बांधकाम वणी नगर परिषद अध्यक्ष तारेंद्रभाऊ बोर्डे, यांनी स्वखर्चातून बनवून दिला तर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या आमदार निधीतून सुद्धा या रस्त्यात मागील काळात सहकार्य मिळाले शिवाय वणी परिसरातील लोकांकडून या वृद्धाश्रमातील लोकांसाठी आश्रमातील वास्तूसाठी मदतीचा हात सदैव शैने शने सुरू आहे. निसर्गरम्य अशा स्थळी असलेले हे वृद्धाश्रम या परिसरात बसविण्यात आलेली श्री भगवान भोलेनाथाची मूर्ती शिवलिंग नंदी, शिवाय महा शिवरात्री महोत्सवास या परिसरातील लोकांची शिव पूजनासाठी होणारी गर्दी ही आस्तेचा विषय बनलेली आहे. सध्या काळात याआश्रमामध्ये नऊ वृद्ध माणसे तर दोन वृद्ध महिला एक सहाय्यक मदतनीस राहतात, त्यांच्यासाठी दोन्ही टाईम सकस आहाराची व्यवस्था शिवाय राहण्याची झोपण्याची व्यवस्था रात्री सत्संग हरिपाठ आदी उपक्रम या आश्रमामध्ये नित्य नेमाने सुरू आहे. शहरातील नामी होतकरू कित्येक समाज सेवक या आश्रमामध्ये आपले वाढदिवस या वृद्धांच्या सहवासात साजरे करतांना दिसून येत आहे वाढदिवसानिमित्त या रुग्णांना फळ वाटप जेवणाची व्यवस्था अन्नदानासारखे उपक्रम या आश्रमात नित्य सुरू आहे. मेघदूत कॉलनीतून आलेल्या पाईप लाईनची गोडपाण्याची व्यवस्था नियमितपणे येथे सुरू आहे. आश्रम संचालकांच्या वतीने आश्रमामध्ये वृक्षारोपण ,आरोग्य शिबिर, मोफतपणे गरीब लोकांचे लग्न लावण्याची व्यवस्था उपक्रम या आश्रमाद्वारे मोठ्या प्रमाणे राबविण्यात येत आहे. घरगुती संसार कंटाळाला त्यागून आलेली ही वृद्ध मंडळी या वृद्धाश्रमांमध्ये आपले जीवन आनंदाने व्यतीत करीत आहे ही सारी परमेश्वराची किमया याबद्दल यवतमाळ जिल्ह्यात वणी तालुका व परिसरात समाजसेवक व मोठ्या व्यक्तींकडून आश्रमाला मदतीचा हातभार लागताना दिसून येत आहे आश्रम संचालकाच्या अथक परिश्रमातून साकार झालेले हे वृद्धाश्रम वणी परिसराला परिस्थितीजन्य गौरवाचा विषय ठरत आहे.