प्रमोद ठेंगणे आत्महत्या प्रकरण संशयित आरोपीना अटक
प्रमोद ठेंगणेच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करण्याची आक्रमक भूमिका
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव शहरातील प्रमोद ठेंगणे या विवाहित तरूणाने चिंचेच्या झाडाला गळफास घेवुन आत्महत्या केली होती प्रमोद याच्या आत्महत्येला आता धक्कादायक वळण लागले आहे.
प्रमोद यांच्या खिशात मिळाले सुसाईड नोट वरुन घरा शेजारी राहणाऱ्या संशयित आरोपी पंढरी भगत व आकाश पंढरी भगत या संशयित आरोपी यांनी प्रमोद यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी मारेगाव पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये प्रमोद ठेंगणे यांच्या नातेवाईकांने आरोपींना अटक करणार नाही तो पर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत नातेवाईकांनी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन संशयित अटक केली