झायलो वाहनाच्या अपघातात चालक गंभीर जखमी
मारेगाव इंडियन ऑईल पेट्रोल पंपा जवळील घटना
प्रतिनिधी/पंकज नेहारे
मारेगाव शहरापासून एक किलो मिटर अंतरावर असलेल्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपा जवळील आज शुक्रवार दि.२५जुन रोजी मांगरूळ येथून झायलो वाहन क्रमांक एम एच १२ एफ झेड१५३६ या वाहनाने मारेगाव कडे येत असताना विपुल दिगंबर राजगडकर वय वर्षे २५ रा. मांगरूळ या वाहन चालकाचे वाहनावरील
नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन चार ते पाच पलट्या खात शेतकऱ्याच्या शेतामध्ये जाऊन वाहन संपूर्ण समोरचा वाहनाचा भाग चेंदामेंदा झाला असल्याने यामध्ये झायलो वाहन चालक विपुल राजगडावर हा गंभीर जखमी झाल्याने त्याला मारेगाव ग्रामीण रूग्णालयात दाखल करुन प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी वणी येथे हालविण्याची प्रक्रिया सुरू होती.