Type Here to Get Search Results !

कुंभा - बोरी(गदाजी)-खैरी रस्त्याची दुर्दैवी अवस्था

कुंभा - बोरी(गदाजी)-खैरी रस्त्याची दुर्दैवी अवस्था

 खासदार आमदारासह स्थानिक लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

 रोडचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची परिसरातील जनतेची मागणी

      सचिन मेश्राम

मारेगाव सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येण्याऱ्या  करणवाडी- खैरी या मार्गाची अतिशय दुर्दशा झाली आहे. कुंभा- बोरी गदाजी- खैरी या मार्गावरील रोड अतिशय खराब झाला असून रोडमध्ये मोठ मोठे गड्डे पडले आहे. डांबर पूर्णपणे निघून गेले आहेत .संपूर्ण रस्ता हा चिखलाने व खड्डयाने माखला आहे. मारेगाव तालुक्यातील हा अत्यंत वर्दळीचा रस्ता असून गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षितच राहिला आहे.रस्त्यात मोठं मोठे गड्डे ,चिखल यामुळे वाहन चालविताना चालकांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. खराब रस्त्यामुळे मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. 
रात्रीच्या वेळी तर वाहन चालविणे कठीण होऊन बसले आहे. रस्ता अत्यंत खराब झाला असल्यामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहे. रुग्णाला रुग्णालयात नेण्यासाठी हा मार्ग तर मृत्यूद्वारच बनला आहे. पाठीचे आजार वाढत आहे. अतिशय खराब दर्जा या रोडचा झालेला असून खासदार आमदारासह स्थानिक लोकप्रतिनिधी सुद्धा दुर्लक्ष करीत आहे. या मार्गाचे लवकरात  नूतनीकरण होणे गरजेचे आहे न झाल्यास भविष्यात मोठ्या आंदोलनाची मशाल पेटल्याशिवाय राहणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies