Type Here to Get Search Results !

युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण

युवासेना प्रमुख तथा राज्याचे पर्यावरण मत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळ वाटप व वृक्षारोपण
  
      प्रतिनिधी/पंकज नेहारे
     
  शिवसेना व युवासेना मारेगाव तालुका शाखेच्या वतीने  महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  यवतमाळ जिल्ह्याप्रमुख माजी आमदार विश्वासभाऊ नांदेकर व युवासेना यवतमाळ जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा  यांच्या आदेशानुसार मारेगाव ग्रामीण रुग्णालय, आणि मारेगाव शहरातील  वृक्षरोपण व रुग्णांना फळवाटप कार्यक्रम, घेण्यात आला . मारेगाव पोलिसांच्या  हस्ते स्वछतादूत सुरेखाबाई यांचा कोरोनादूत म्हणून शाल व श्रीफळ देेेवून सत्कार   आला. त्यावेळी मारेगाव शहराच्या माजी नगराध्यक्षा रेखाताई मडावी, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजूभाऊ मोरे, तुळशीराम मस्की , युवासेना तालुकाप्रमुख मयूर ठाकरे,युवासेना तालुका संघटक श्रीकांत सांबजवार, युवासेना शहर प्रमुख गणेश आसुटकर, दिगंबर नावडे, पंकज बल्की, अनिकेत मानकर, रवी कूचनकार, अनिकेत चोपने, आकाश दभरे यासह अनेक शिवसैनिक व युवासैनिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies