आदिवासी महिलांना मारहाण करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर कारवाई करा
पांढरकवडा तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देवून केली मागणी
कैलास मेश्राम
पांढरकवडा/ झरीजामणी तालुक्यातील वरपोड येथील आदिवासी कोलाम जमातीच्या महिलांना अमानुष मारहाण प्रकरणणातील वन विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनासह अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हे दाखल करा असे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले.
यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन विभागाच्या अधिकारी व पोलीस यांच्या वतीने दिनांक२५/ ४/ २०२१ रोजी वाघीण शिकार प्रकरणात झरीजामणी तालुक्यातील वरपोड येथील आदिवासी
कोलाम जमातीच्या वस्तीवर ३०० वन अधिकारी व कर्मचारी आणि शंभर पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने सयंशीत पुरुषांना पकडण्याच्या उद्देशाने दिनांक १९/ ०६/२०२१ ला पहाटे साडेपाच वाजता कार्यवाही करण्यात आली परंतु या कार्यवाहीत वरपोड गावातील एकूण आदिवासी कोलाम महिलांना विनाकारण मारहाण अमानुष मारहाण करण्यात आले त्यात गर्भवती महिला व एक अल्पवयीन मुलगी होती त्यांनासुद्धा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अधिकारी यांनी बेदम मारहाण केली अनुसूचित क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचे काम केले आहे आदिवासी कोलाम जमातीत वाघाला कुलदैवत वाघोबा या नावाने संबोधले जाते त्यांची परंपरागत प्रथेनुसार पूजा केली जाते वाघाला मारल्या जात नाही तसे असते तर कोलाम समाज बहुल क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील एकही वाघ शिल्लक राहिला नसता याकरिता केवळ सायन्स कार्यवाही निमित्त्य विनाकारण आदिवासी कोलाम जमातीच्या महिलांना मारहाण करणाऱ्या वन संरक्षण विभागाच्या अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध ॲट्रॉसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आदिवासी जमातीला न्याय देण्यात यावा अशी मागणी निवेदनातू केली आहे.संभा मडावी,दिपक आत्राम, दादाराव आत्राम,कैलास आत्राम, मिरा टेकाम,कौशल्या टेकाम रघुनाथ किनाके, लखेबार आत्राम यावेळी उपस्थित होते