पांढरकवडा येथे भाजपाचे चक्काजाम आंदोलन
काहीकाळ वाहतूक टप्प
प्रतिनिधी/योगेश देठे
पांढरकवडा - ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा इंपीरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात सादर न केल्याने हे आरक्षण रद्द झाले आहे. हा प्रकार राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे घडला. ओबीसी विरुद्धचा व्देष्टेपणा या भूमिकेतून स्पष्ट झाला असल्याने पांढरकवडा
भाजपा व ओबीसी मोर्चाच्या वतिने बहुसंख्य ओबीसी बांधव व भाजपा नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पांढरकवडा येथिल वाय पाईंट येथे चक्काजाम आंदोलन शनिवार दि.२७जुनला करण्यात आले.चक्काजाम झाल्यामुळे काहीकाळ वाहतुक ठप्प पडल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन सोडले यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या धोरणाविरुद्ध बॅनर झळकविले व घोषणाबाजी केली या आंदोलनात अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.