नागपूर -हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर अपघात एक ठार एक गंभीर जखमी
वणी शिवारातील घटना
वर्धा
जिल्हा प्रतिनिधी /सचिन महाजन
हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वरील सुगुणा कंपनी जवळ आज शनिवारी दुपारच्यावेळी टैंकरने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वर जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज दुपारी घडली. हिंगणघाट तालुक्यातील वणी येथील हा अपघात झाल्याने
टैंकर क्र एमएच-२१ डब्ल्यू-६४४७ हा नागपुर येथून हैदराबाद जाण्यासाठी निघाला होता.या दरम्यान हिंगणघाट तालुक्यातील सेलु मुरपाड येथील वैभव नेहारे (२३) तसेच मयूर विलास कुमरे(२४) हे दोघे युवक पल्सर दुचाकी क्रमांक एम एच -३४ क्यू-३५ ९४ ने सुगुणा कंपनी कड़े निघाले होते,त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन समोरून येत असलेल्या टैंकरने जबर धडक. दिल्याने दुचाकी चालक वैभव नेहारे (२३) जागीच ठार झाला तर मागे बसून असलेला एक जण गंभीर जखमी झाला.
सदर अपघात हिंगणघाट तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर वणी शिवारात घडली.
या अपघाताची माहिती पोलीसांनी मिळताच अपघात स्थळी दाखल होवून जखमी ना उपचारासाठी हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार जखमी ना पुढील उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात पाठविण्यात आले असुन .
मृतकाच्या दुचाकीवर बसुन असलेला हे दोघे जण सुगुणा कंपनी मध्ये नोकरी शोधण्यासाठी दुचाकीने निघाले होते,परंतु रस्त्यातच त्यांचा असा दुर्दवी अपघात घडला. या घटनेचा पुढील तपास हिंगणघाट पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक वसंत शुक्ला,पोलीस शिपाई सौरभ गेडाम करीत आहे.