Type Here to Get Search Results !

सुमो - दुचाकी अपघातातील गोंडबुरांड़ा येथील युवकाचा चंद्रपूरात मृत्यू-

सुमो - दुचाकी अपघातातील गोंडबुरांड़ा येथील युवकाचा चंद्रपूरात मृत्यू
- गोंडबुरांडा येथे हळहळ
     मारेगाव : दीपक डोहणे 
       सुमो गाडी व  दुचाकी अपघातात जखमी होवुन त्याचेवर चंद्रपुर येथे उपचार सुरु असतांना आज मंगळवारला सकाळी साडेसात वाजताचे दरम्यान मृत्यू झाला.सदर अपघात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताचे दरम्यान गोंडबुरांडा नरसाळाच्या वाटेत झाला.
       समीर वासुदेव काकडे (२७) रा.गोंडबुरांडा ता.मारेगाव असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.मागील शुक्रवार रोजी समीर हा नरसाळा मार्गे गोंडबुरांडा येथे दुचाकीने जात होता.त्या अपघातात  समीर हा गंभीररित्या जखमी झाला.मारेगाव येथे प्राथमिक उपचारा नंतर चंद्रपुर येथील खासगी रुग्णालयात त्याचेवर उपचार सुरु होता.डोक्याला जबर मार लागल्याने त्याची आज सकाळी साडेसात वाजता मृत्यूची झुंज अखेर ठरली.
     समीर काकडे यांच्या पश्चात आई,एक बहीण व दोन भाऊ आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies