Type Here to Get Search Results !

वस्तीगृह कर्मचाऱ्याची मुलगी झाली डॉक्टर

वस्तीगृह कर्मचाऱ्याची मुलगी झाली डॉक्टर

       मारेगाव वार्ता
     जिल्हा प्रतिनिधी
        रोहन आदेवार
यवतमाळ (घाटजी) तुटपुंज्या मानधनावर सेवा देणाऱ्या वस्तीगृह कर्मचाऱ्यांची व्यथा जगजाहीर असुन या साधारण कुटुंबाचा महिन्याचा खर्च निघत नाही, एवढे अल्पसे मानधन  पण याच विषम परिस्थितीमध्ये संघामित्रा मुलींचे वसतिगृह येथे अध्यक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या मीराताई वाकपैजन व वस्तीगृह कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी लागू करण्यासाठी अविरत लढा देणारे प्रदीप वाकपैजन यांची मुलगी प्रज्ञा उर्फ समिक्षा ही नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या एम. बी. बी. एस. च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
त्यामुळे तिच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे
प्रज्ञा हिने १० वी पर्यंत चे शिक्षण स्थानिक श्री. समर्थ विद्यालयात घेतले. त्यानंतर इयत्ता ११वी १२वी व वैद्यकीय प्रवेश परीक्षा शाहू विज्ञान महाविद्यालय, लातूर येथून नीट ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर तिचा प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे झाला. तेथेच तिने डॉक्टरकीचे धडे घेतले. नुकत्याच  एम.बी.बी.एस.च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन तिने घवघवीत यश प्राप्त करून अत्यंत विषम परिस्थितीत सतत परिश्रम घेवून, नियमित यश संपादन करून डॉक्टर होण्याचे स्वतःचे व आई वडिलाचे स्वप्न साकार केले आहे. 
आई मिराताई संघमित्रा मुलींचे वसतिगृह घाटंजी येथे अधिक्षिका या पदावर सन २००० पासून ₹.६००/-ते आजमितीला ₹.९२००/- मानधनावर कार्यरत आहे. वडील महाविद्यालयीन जीवनापासून सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक, बहुजन चळवळीत कार्यरत आहेत. असे असतानाही हालाखीच्या परिस्थितीतुन मार्ग काढत असतांना लेकरांच्या शिक्षणाकडे दोघांनीही दुर्लक्ष केले नाही. म्हणून आज समिक्षा श्रमाची जाणीव ठेवून उच्च शिक्षण क्षेत्रात वावरत आहे. तसेच तीची लहान बहीण सुजाता उर्फ प्रेरणा हीणे सुद्धा मोठ्या बहीणीच्या पाऊलावर पाऊल ठेवून याच वर्षी नीट च्या परिक्षेत यश संपादन करून शासकीय महाविद्यालय, गोंदिया येथे एम. बी. बी. एस.च्या प्रथम वर्षाला शिक्षण घेत आहे. जीवनात परिस्थितीवर मात करून जिद्द, मेहनत व चिकाटीच्या भरोशावर आदर्श निर्माण करता येतो. हे प्रज्ञा ने सिद्ध करून दाखविले आहे. समिक्षा यशाचे श्रेय आई वडील, आजी आजोबा, नातेवाईक, गुरूजनांना तसेच मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, सचिव, सदस्य व शिक्षक, आदर्श नेता, अभियंता प्रशात ठमके यांना देते.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
  1. सही आहे कदाचित आज जी परिस्थिती आहे प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये जे कोरोना रुग्णाचे बिल 5,6लाख जे आहे ते काही प्रमाणात कमी होईल

    उत्तर द्याहटवा

Top Post Ad

Hollywood Movies