साई मित्र परिवार तर्फे गरजुनां जिवनाआवशक वस्तूचें वाटप
कोविड १९कोरोना संसर्ग गंभीर रूप धारण करीत असून राज्यात चौथे लॉकडाऊन नुकतेच घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठ बंद आणि सर्वत्र संचारबंदी असल्याने नागरिकांना घरातच बसा असे निर्देश प्रशासनाने दिले.
मारेगाव वार्ता
प्रतिनिधी: पंकज नेहारे
मारेगाव : सततच्या लॉक डाऊनमुळे रोजगार हिरावला गेला. परिणामी अडचणीच्या भोवर्यात अडकलेल्या उपेक्षित व गरजू कुटुंबांना १०० किराणा किट वितरण करून साई मित्र परिवार यांनी मदतीचा हात दिला आहे. साई मित्र परिवारच्या सदस्यांनी शंभर गरजूंना किटचे वितरण केले आहे.
कोविड १९ करोना संसर्ग गंभीर रूप धारण करीत असून राज्यात चौथे लॉकडाऊन नुकतेच घोषित करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात बाजारपेठ बंद आणि सर्वत्र संचारबंदी असल्याने नागरिकांना घरातच बसा असे निर्देश प्रशासनाने दिले असुन
सर्वत्र बाजारा, उद्योगधंदे बंद असल्याने अनेक कुटुंबाचा रोजगार हिरावल्या गेला आहे. अशा संकटकालीन परिस्थितीत बेरोजगार व्यवसायिक गरजू मजूर व हातावर पोट असलेल्या शंभर कुटुंबांना मदतीसाठी साई मित्र परिवारातील व्यक्तीं पुढे आल्या आहेत. साई मित्र परिवार यांनीही उपेक्षित गरजूंना मदतीचा हात दिला आहे. मारेगाव शहरातील शंभर किरणा किट वाटप करून गरजवंत कुटुंबांना त्यांनी एक प्रकारे धीर दिला आहे.