Type Here to Get Search Results !

युवा मोर्चा शहर अध्यक्ष अनुप महाकुलकर यांनी दिले

युवा मोर्चा शहर अध्यक्ष  अनुप महाकुलकर यांनी दिले प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांना स्वखर्चाने पाणी
 पंकज नेहारे
मारेगाव शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधील पाणी पुरवठ्याची मोटार जळाल्याने पाण्यासाठी नागरिकांची भटकंतीची वेळ आली. भाजप युवा मोर्चा चे मारेगाव शहर अध्यक्ष अनुप  महाकुलकर हे शहरवासियांच्या भटकंतीला धावून आल्याने प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी त्यांनी स्वखर्चाने पाणी टँकर देण्यास सुरुवात केली आहे.
सध्या उन्हाची तीव्रता वाढली असून प्रभाग क्रमांक ६ मध्ये पाण्याची मोटार जळली असून  महिलांना पाण्यासाठी भटकंती होऊ नये म्हणून भाजप युवा मोर्चाचे मारेगाव शहर अध्यक्ष स्वखर्चाने पाण्याचे ट्रँकर भरुन नागरीकांची तहान भागवत आहे. खरंतर पाणी पुरवठा करणे ही नगरपंचायतची जबाबदारी आहे. अशा टंचाईच्या आणि अडचणीच्या काळात नागरिकांना वाऱ्यावर सोडणे योग्य नाही. 'ज्या समाजात आपण जन्मलो त्या समाजासाठी काही आपलं देणं लागतं' या सामाजिक जवाबदारीतून भा.यु.मो. श.अध्यक्ष. मारेगाव अनुप महाकुलकर यांनी स्वखर्चाने पाणी पुरवठा करत आहेत. त्यांच्या या सौदार्य उपक्रमामुळे नागरिकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies