प्रशासकीय कर्मचार्यांनी समाजसेवेचे पाईक व्हावे
नायब तहसीलदार व्ही.बी.दासरवार यांचे प्रतिपादन
सेवानिवृत्ती बद्दल सपत्निक भावपुर्ण गौरव
मारेगाव : दीपक डोहणे
प्रशासकीय प्रामुख्याने कर्तव्यात असतांना अधिकारी असो की कर्मचारी यांनी स्वभावात दूराग्रह बाळगू नये.कामे करावयास येणाऱ्या अनेकांना आपले काम
तात्काळ व निस्पृह व्हावे अशा माफक अपेक्षा असतात. तो तळागाळातील किव्हा सर्वसामान्य असो त्यांचे पारदर्शक कामे केल्यास मानसिक हर्ष हा मापदंडात मोजता येत नाही.ही आयुष्यभराची शिदोरी कायम ठेवण्यासाठी प्रशासकीय कर्मचार्यांनी समाजसेवेचे पाईक व्हावे असा मौलिक सल्ला नायब तहसीलदार व्ही.बी.दासरवार यांनी दिला.
मारेगाव येथील नायब तहसीलदार दासरवार हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत झाल्याबद्दल त्यांचा सपत्निक व तलाठी खैरे यांचा तहसिल सभागृहात महसूल कर्मचारी संघटना,विदर्भ पटवारी संघटना व मंडल अधिकारी संघटनेच्या सयुक्त विद्यमाने आयोजित शाल व श्रीफळ देवून भावपुर्ण गौरव करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार दीपक पुंडे होते.नायब तहसिलदार दिगांबरजी गोहोकार,सत्कारमुर्ती व्ही.बी.दासरवार त्यांची अर्धांगीनी भारती दासरवार,तलाठी खैरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
विवेक बापुराव दासरवार यांनी प्रशासकीय सेवेतील तब्बल ३६ वर्ष सेवा केल्यानंतर बुधवारला ते मारेगाव येथे सेवानिवृत्त झाले.मुळ गाव वणी असलेल्या दासरवार यांनी प्रशासकीय सेवेची अवघ्या २२ व्या वर्षी मुहुर्तमेढ रोवली.तलाठी या पदावर उमरखेड येथे रुजू झाल्यानंतर पदोन्नती होत त्यांचा प्रशासकीय सेवेतील मंडल अधिकारी म्हणून महागाव, घाटंजी ,झरी जामनी येथे प्रशासकीय सेवा दिली.मारेगाव तहसिल कार्यालयात पारदर्शक नायब तहसीलदार म्हणून सर्वांना समान अधिकार,प्रशासकीय कामातील समतरता ,मृदू भाषिक आणी तळागाळातील सर्वसामान्यांना न्यायिक भावनेने त्यांचे कार्य ,कामे करण्याच्या शैलीने जनसामान्यात वेगळाच ठसा उमटवित सर्वांना आपलेसे करवून घेतले.प्रशासकीय सेवेतील तब्बल ३६ वर्ष सेवेनंतर ३१ मार्च रोजी सेवानिवृत झालेत.
या भावनाविवश प्रसंगात बोलतांना त्यांनी आयुष्यातील काळजाचे ठोके चुकविणारे प्रसंग शब्दरूपी कथन करित कर्तव्यात असतांनाही लोकाभिमूख व्यक्तीमत्वाने मी सर्वांच्या मनात रुजलो हीच माझ्यासाठी खरी पावती असल्याने स्वभावात दूराग्रह येवू दिला नसल्याने आजचा सत्कार सोहळा मला कर्तव्यातच असल्याची जाणीव करवून देत आहे.आजतागायत वेगवेगळ्या अनुभवाने भावनाविवश झालेल्या दासरवार यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. यावेळी सर्वच संघटनांच्या पदाधिकारी यांनी आपल्या भावना व्यक्त करित गौरव केला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडल अधिकारी कैलास भगत यांनी केले.