Type Here to Get Search Results !

अधिकार्यांच्या घरालाच कोरोनाचा विळखा

धक्कादायक..
 अधिकार्यांच्या घरालाच कोरोनाचा विळखा 
- मारेगावात नव्याने नऊ रूग्ण
   मारेगाव : सचिन मेश्राम 
     मारेगाव तालुक्यात कोरोना संसर्गजन्य रूग्ण दिवसागणिक वाढत असल्याची धक्कादायक माहिती प्राप्त  झाली असुन यात कोरोनाने चक्क अधिकार्यांच्या घरालाच विळखा घातला आहे.तर शहरात आणखी दोन बाधितांची भर पडुन नऊ चा आकडा नव्याने समोर आला आहे.
    कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करित असतांना यातील अधिकार्यांच्या घराला कोरोना संसर्गाने कवेत घेतल्याचा दुजोरा आरोग्य विभागा कडुन मिळाला.यात तब्बल सात जन पॉझिटीव्ह असल्याची माहिती आहे.दरम्यान शहरातील आणखी दोघे जन बाधित झाल्याने बाधित रुग्णाचा आकडा नव्याने नऊ वर गेला आहे.
    परिणामी कोरोना संसर्ग मारेगाव तालुक्यात दिवसागणिक पाय पसरत असल्याने आगामी काळात संभाव्य धोका टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies