Type Here to Get Search Results !

मारेगाव नगरपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी २४तास दारूच्या नशेत

मारेगाव  नगरपंचायत पाणी पुरवठा कर्मचारी २४तास दारूच्या नशेत

   तिन प्रभागकाचा पाणी पुरवठा  पाच दिवसापासून खंडित?

 मारेगाव वार्ता 
 कैलास मेश्राम

मारेगाव शहरातील  प्रभाग क्रमांक दहा,नऊ , दोनचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या बोर वरुन पाणीपुरवठा प्रभाग क्रमांक  प्रभागामध्ये केला  जातो पण या तिन ही प्रभागाचा  पाणी पुरवठा  कर्मचारी नेहमी दारूच्या नशेत राहत असुन तो कर्मचारी बोर चालू करून दारू पिण्यासाठी जात असल्याने तो बोर बंद करण्यासाठी येत नसल्याने या  कर्मचाऱ्याच्या दुर्लक्षित पणामुळे  अनेकदा बोर जळून खाक होवून सुध्दा नगरपंचायतीच्या मुख्यधिकारी यांच्या कडे अनेकदा प्रभाग क्रमांकाच्या दहा, दोन, नऊच्या नागरिकांनी निवेदन देवून व  तोंडी तक्रार देवून सुध्दा वरिष्ठ अधिकारी या पाणी पुरवठा कर्मचाऱ्याची का पाठराखण करत आहे?. प्रभाग क्रमांकाच्या दहा, नऊ, दोनच्या नागरिकांना मागील पाच दिवसापासून पाणीपुरवठा न झाल्याने नागरिकांना  मनस्तब्द त्रास सहन करावा लागत असुन पाच दिवसापासून मोटार जळाल्याने प्रभाग क्रमांक दहा,
नऊ,दोनच्या नागरिकांना पाच दिवसापासून पाणी न मिळल्याने या पाणीपुरवठा कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies