धक्कादायक...
दांडगाव ,हिवरा ,गोरज ,मुकटा शिवार बनले अवैद्य रेतीसाठ्याचे माहेरघर
- पारदर्शक तपासात हजारो ब्रॉस रेतीवर कारवाईची टांगती तलवार?
- मारेगाव प्रशासना कडुन चौकशीचा फास
मारेगाव : दीपक डोहणे
मागील वर्षभर लॉकडाऊन पडदा हटवित वाळू माफियांनी हजारो ब्रास रेतीचा साठा जमा करित प्रशासनास आव्हान दिले.अनेकांनी दांडगाव,आपटी व हिवरा शिवारात रेती साठा जमा केल्याचे बोलले जात असतांना प्रशासनाने पारदर्शक सर्वे व चौकशी केल्यास तथाकथीत वाळू माफियाचे पितळ उघड होवू शकते.दरम्यान प्रशासना करवी सर्वे चालू असतांना अनेकांचे धाबे दणाणले आहे.
मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या तिरावर वसलेल्या गावा नजिकच्या वाळू माफीयांनी ' रात्री ' चा दिवस करित हजारो ब्रॉस रेतीचा साठा आपल्या खास निर्जन स्थळी साठवून ठेवल्याची विश्वसनिय माहिती प्राप्त झाली आहे.यात दांडगाव,गोरज व हिवरा गावाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.
मागील वर्षाला रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले होते.ग्राहकांना अव्वा च्या सव्वा दराने रेतीची विक्री करून वरकमाई करण्यात आली.अनेकांनी आपल्या शेत शिवारात व निर्जन स्थळी वाळू साठा जमा केल्याची माहिती आहे.
दरम्यान प्रशासकीय स्तरावरुन या अवैद्य वाळू साठ्याची कसून चौकशी मंडल अधिकारी वरठे व तलाठी करित आहे.चौकशी दरम्यान हिवरा व मुकटा येथील ४० ते ५० ब्रॉस वाळू साठा जप्त करण्यात आला आहे.आता चौकशीचा पारदर्शक मोर्चा दांडगाव व गोरज कडे वळविला तर हजारो ब्रॉस रेती जप्त होवू शकते.त्या दृष्टीने सकारात्मक पावले प्रशासनाचे पडत असतांना वाळूसाठा जमा करणार्यांच्या पायाखालची वाळू मात्र सरकत आहे.