ट्रँक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
मारेगाव : पंकज नेहारे
मारेगाव वरुण खडकी बुरांडा येथे दुचाकीने स्वगावी जाणार्या ट्रँक्टरने मागावुन धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मारेगाव राज्य महामार्गावरील इसार पेट्रोल पंप समोर सोमवारला रात्री सात वाजताचे दरम्यान घडली.दरम्यान ,अपघाताची भीषणता पाहून ट्रँक्टर चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला.
ट्रँक्टर क्रमांक एम.एच.२९ सी.४५१४ हे वहान मारेगाव वरुण करनवाडी कडे भरधाव वेगाने जात होते.त्यासमोर दुचाकी क्रमांक एम.एच.२९- ८४५५ ही (खडकी) बुरांडा कडे जात असतांना ट्रँक्टर ने दुचाकीला मागावुन जबर धडक दिली.यात दुचाकीस्वार बळीराम गुंजेकर (४०) रा.गोंडबुरांडा हे जागीच ठार झाले.अपघात होताच ट्रँक्टर चालकाने घटनास्थळावरुंन पोबारा केला.परिणामी मृतकाच्या मागे आई ,वडील ,पत्नी ,चार मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आहे.