मारेगावच्या कृषी संचालकाचा कोरोना ने घेतला बळी
मारेगाव तालुक्यात पुन्हा चार बाधितांची संभाव्य शक्यता
....मारेगाव - दीपक डोहणे....
मारेगाव तालुक्यात कोरोनाची एन्ट्री झाल्यागत बाधिताचा आकडा फुगतो आहे.यात मारेगाव येथील कृषी संपदा चे संचालक यांचे कोरोना संसर्गाने नागपुर येथे उपचारा दरम्यान निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय (४७) होते.दरम्यान मारेगाव येथे मंगळवार ला पुन्हा चार जण पॉझिटीव्ह असल्याची संभाव्य शक्यता आरोग्य विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.प्रस्तुत प्रतिनिधींनी या बाबत तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांचे सोबत वारंवार भ्रमणध्वनी वरुण संपर्क साधला असता प्रतिसाद देत नसल्याने बाधित आकडेवारीस अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
मारेगाव येथील आंबेडकर चौक येथील कृषी संपदा चे संचालक हे बारा दिवसा पासुन कोरोना संसर्गजन्य रोगाने बाधित झाले होते.लगेच त्यांना यवतमाळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले.येथून पुढील उपचारार्थ नागपुर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उपचारा दरम्यान आज मंगळवार ला सकाळी साडे दहा च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालविली.त्यांच्या मृत्युने मारेगाव येथे शोककळा पसरली असुन मारेगाव येथील कृषी केंद्र प्रतिष्ठाने बंद करुन मामा म्हणून सुपरिचित असलेल्या भुजंग वरारकार यांना आदरांजली वाहण्यात आली यांच्या मागे वडील ,पत्नी व दोन मुले असा आप्तपरिवार आहे.
दरम्यान,मारेगाव तालुक्यात आज पुन्हा चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती आहे मात्र प्रशासकीय अधिकारी यांचे कडुन अधिकृत दुजोरा मिळाला नाही.परिणामी ,कोरोना चा वाढता आलेख पाहता नागरिकात भितीचे सावट कायम निर्माण झाले आहे.