पशुधनाच्या वैरणाची तात्काळ उपलब्धता करा
🔸अतिवृष्टी व पुराने होतेय पशुधनाची गैरसोय
🔸मारेगाव तालुका काँग्रेसची मागणी
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील कुंभा मार्डी परिसरातील अतिवृष्ठीने आणि पुराने शेतशिवाराचे अतोनात नुकसान झाले.शेतकाऱ्यासोबत पशुधनाची प्रचंड गैरसोय होत असल्याने पशुधनाच्या वैरणाची तात्काळ व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
मारेगाव तालुक्याला प्रामुख्याने मार्डी व कुंभा परिसरातील बहुतांश गावाला पूर परिस्थिती व अतिवृष्ठीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले.अजूनही शेकडो हेक्टर शेत पिके पाण्याखाली असल्याचे भयाण वास्तव आहे.या विदारक परिस्थितीत वैरणही पूर्णतः वाहून गेले त्यामुळे पशुधनाचा वैरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
तालुक्यातील चिंचमंडळ , दापोरा , कोसारा , सोईट , गदाजी बोरी , चनोडा , चोपण , केगाव , शिवणी , मुकटा , दांडगाव , आपटी , गोरज , वनोजादेवी यासह बहुतांश गावात अतिवृष्ठी व पुराने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.यात पशुधनाची वैरणा अभावी कामालीची गैरसोय शेतकऱ्यांच्या पथ्यावर आहे.त्यामुळे तात्काळ पशुधनाच्या वैरणाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या अरुणताई खंडाळकर , तालुका अध्यक्ष मारोती गौरकार , अरविंद वखनोर , गणपत ढवस , कवडू कुमरे ,रामाजी कुमरे , भूषण कोल्हे , मोहन व्यापारी , अशोक दुपारे , वामन लांडे , बंडू दुर्गे आदींनी तहसील प्रशासनास दिलेल्या निवेदनातून केली आहे.