नवरगाव धरणावर भरते मारेगावचे कॉलेज
🔸ऐन पावसात "जुम्मा चुम्मा" चा महापूर
🔸मारेगाव सह वणी तालुक्यातील युगुलांची झुंबड
मारेगाव - दिपक डोहणे
अजी माई बाली रोज कालेजात जाते असे अभिमानाने आनंदाने सांगणाऱ्या पालकांनो सावधान....!तुमची पोरं कालेजात जाते की तरुणाच्या कालेजात जाते हे काळजीपूर्वक तपासण्याची वेळ आली आहे.कारण सध्या गुलाबी पावसात मारेगाव चे अनेक कालेज चक्क नवरगाव धरणावर सुरू आहेत. अनेक कालेज कुमार-कुमारिका यांची तौबा गर्दी या धरणावर बघायला मिळत आहे.शिक्षण कमी अन भानगडी अधिक असे चित्र निर्माण झाले आहे.
१०५ गावं समाविष्ट असणारा मारेगाव तालुका. त्यामुळे अनेक खेड्यापाड्यातुन मारेगाव च्या विविध कालेज शेकडो नव तरुण- तरुणीका शिक्षण घेण्यासाठी दररोज येतात.मोबाईल अन सोशल मीडिया याच्या माध्यमातून वयात आलेल्यांचे वाकडे पाय पडत आहे.शिक्षणा सोबतच प्रेम करणे अत्यावश्यक आहे ही समज झालेले युवक -युवती एकमेकांसोबत एंगेज झाल्याचे चित्र आता फारसे नवीन राहिले नाही.असे अनेक प्रेमीयुगल एकांताचा आसरा शोधत नजीकच्या सुप्रसिद्ध नवरगाव धरणावर भुर्रकन उडून जात आहे.सध्या या धरणावर अनेक किळसवाणे, अश्लीळ चाळे सुरु आहेत.यामुळे सहपरिवार पिकनिक ला आलेल्या परिवारांची शरमेने मान खाली जात आहे.
पावसामुळे ग्रामीण भागातील संपूर्ण परिवार शेतात जात आहे.केवळ घरातील बाली अथवा बाब्या कॉलेजच्या नावावर थेट धरणावर जात रंगीबेरंगी खेळ करीत आहे.धरणावरील निरव शांततेत हा राजरोसपणे प्रेमयुगुलांचा लपंडावी खेळ जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे.
सुजाण पालकांनी आपले मुलं नेमके जातात कुठे याबाबत दक्ष राहण्याची गरज आता निर्माण झाली आहे.अन्यथा आपली मुलं सुध्दा कधी धरणाच्या आडोश्याला दिसेल याचा नेम नाही.