धक्कादायक...
दोन दिवसात वाघाने पाडला दोन पशुधनाचा पडशा
🔸बोटोणी शिवारातील रोहीपठार येथील घटना
🔸शेतकरी - मजुरात कमालीची दहशत
बोटोणी : सुनील उताणे
खैरगाव बोटोणी शिवारातील जंगलात वाघाचा वावर वाढला असून पशुधनास लक्ष केंद्रित करणाऱ्या वाघाने दोन दिवसात दोन पशुधनाचा पडशा पाडल्याची दुर्देवी घटना उघडकीस आली.
तालुक्यातील खैरगाव भेदी रस्त्यालगत असलेल्या रोही पठार जंगल पावसाने हिरवेकंच अन घनदाट बनले आहे.यात मागील काही दिवसांपासून वाघाचा वावर कमालीचा वाढला आहे.बोटोणी परिसरातील गावे असलेल्या गावातील पशुधन वैरणासाठी जंगलात जाणे हा नित्याचा क्रम आहे.गुरुवारला सेवालाल चव्हाण रा. खैरगाव (भेदी ) यांच्या मालकीची गाय किमान पंधरा हजार रुपये व बोटोणी येथील सूर्यभान दडांजे यांच्या १५००० रुपये किमतीच्या गायीचा वाघाने पडशा पाडला.दरम्यान , या घटनेने शेतकरी तथा शेतमजुरात कमालीची दहशत पसरली आहे.