कुंभा येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त सामाजिक जाणीवेचा प्रत्यय
🔸हर घर तिरंगा , रक्षाबंधन सह साडीचे वाटप
🔸सरपंच अरविंद ठाकरे यांचा स्तुत्य उपक्रम
मारेगाव : प्रतिनिधी
देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र साजरा होत असतांना ग्रामपंचायत कुंभा येथे आझादी का अमृत महोत्सवांतर्गत हर घर तिरंगा वाटप करण्यात आले.यावेळी रक्षाबंधन कार्यक्रमासह महिला कर्मचारी यांना साड्या भेट देऊन सामाजिक जाणीवेचा प्रत्यय कृतीत उतरविला.
कुंभा येथील सरपंच अरविंद भाऊ ठाकरे यांच्या विशेष सहकार्याने आझादी का अमृतमहोत्सव अंतर्गत ग्रामस्थांना हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येऊन ग्रामस्थांना वाटप करण्यात आले.
येथील सचिव उईके यांच्यासह सरपंच अरविंदभाऊ ठाकरे , उपसरपंच गजानन ठाकरे , ग्रामपंचायत कर्मचारी अविनाश शेंडे , प्रभाकर किनाके , हरिष वाघ , नानाजी रस्से , महादेव महाडूळे आदींना अंगणवाडी सेविका , मदतनीस , आरोग्य सेविका यांनी राखी बांधून ओवाळणी करीत रक्षाबंधन साजरा केला.रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून सेविका , मदतनीस व आरोग्य सेविका , आशा वर्कर यांना यावेळी साड्या प्रदान केल्या.देशात सर्वत्र आझादी का अमृत महोत्सव साजरा होत असतांना कुंभा येथे या उपक्रमाने सामाजिक जाणिवेचा प्रत्यय आणला.