आत्महत्येची धग....
वृद्धाने घेतला गळफास
🔸मारेगाव तालुक्यातील सगणापूर येथील घटना
🔸खासगी कर्ज शिरावर असल्याचा संशय
नवरगाव : संदीप कोवे
तालुक्यातील सगणापूर येथील ७२ वर्षीय वृद्धाने स्वतःचे घरात गळफास लावून जीवनयात्रा संपविल्याच्या घटना आज दि.१३ ला घडली.
शामराव भीमा डोंगरे असे गळफास लावलेल्या वृद्धांचे नाव आहे. शेती नसलेल्या वृद्ध हा सगणापूर शिवारात ठेक्याने शेती करायचा.अशातच त्याचेवर लाखो रुपयांचे कर्ज असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.परिणामी अपत्य नसलेल्या वृद्धांची पत्नी कायम अपंग आहे.अशातच त्याच्या मनाची कालवाकालव होत असतांना व कर्जामुळे काही दिवसापासून अस्वस्थ असलेल्या वृद्धाने आज शनिवारला स्वतःचे घरी गळफास लावून जीवनाचा अखेर केला.
मारेगाव पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून उत्तरीय तपासणीसाठी वृद्धांचे शव मारेगाव येथे आणण्याच्या हालचाली सुरू होत्या.पुढील तपास मारेगावचे ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस जमादार करीत आहेत.