आत्महत्येची धग...
विद्युत खांबावर चढून युवकाची आत्महत्या
🔸बोटोणी येथील घटना
बोटोणी : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यात विष , गळफास , विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविल्याच्या घटना नव्या नाहीत.मात्र चक्क विद्युत खांबावर चढत जिवंत विद्युत तारेला स्पर्श करीत युवकाने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना मंगळवार ला रात्री दहा वाजताचे सुमारास बोटोणी येथे उजेडात आली.जीवनयात्रा संपविण्यासाठी वेगळी क्लुप्ती करणाऱ्या घटनेचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
बळीराम मारोती घाटे (२२) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.बोटोणी गावा मागील एका बंधाऱ्या शेजारी असलेल्या विद्युत पोलवर हा युवक चढून चक्क जिवंत विद्युत तारेला स्पर्श केला.यातच त्याचा मृत्यू होऊन खाली पडला.मात्र नेमकी खांबावर चढुनच जीवनयात्रा का संपविली याबाबत तर्कवितर्काला उधाण आले आहे.परिणामी मृतकाच्या पश्चात आई , दोन भाऊ व बहीण असा परिवार आहे.