पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीचा दुरुपयोग...
मारेगाव तालुक्यात अव्वाच्या सव्वा दराने जलशुद्धीकरण बॉटल खरेदी
नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून जिल्हा परिषदेने पंधराव्या वित्त आयोगातून जलशुद्धीकरण बॉटल खरेदी करण्याचे ग्रामपंचायतींना आदेश दिले. मात्र सचिवांनी मनमर्जीने जल शुद्धीकरण बॉटल अवाजवी भावाने खरेदी करीत लाखो रुपयाचा मलिंदा लाटत असल्याचा धक्कादायक प्रकार आहे .त्यामुळे या निधीचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रामपंचायतीकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
पंधराव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार बंधित अनुदानाचा वापर शासनाने निश्चित केलेल्या कामासाठी केला जावा. जसे स्वच्छता, हागणदारीमुक्त, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थिती कायम राखणे तसेच पेयजल, पाणीपुरवठा, जल पुनर्भरण, रेन वॉटर हार्वेस्टिंग ,जल पुनर्प्रक्रियेत हा निधी खर्ची करणे बंधनकारक असते. तर अनटाईड म्हणजे आवश्यक गरजांचा विचार करून त्यानुसार आवश्यक कामावर खर्च करण्याचे आदेश दिले जाते. हे आदेश म्हणजे सचिवांत करिता पर्वणी ठरत आहे.
मारेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या अनेक ग्रामपंचायतीमध्ये अनागोंदी कारभार हाकला जात आहे. आदिवासी भागातील प्रामुख्याने पेसा अंतर्गत ग्रामपंचायतीची पुरती वाट लागलीआहे . सचिव मनमानी करित लोकप्रतिनिधीच्या अज्ञानाचा फायदा घेत कुठलीही कल्पनां न देता निधीची विल्हेवाट लावली जाते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जलशुद्धीकरण बॉटल वाटप करण्याचे आदेश दिले. ही संधी हेरून लाखो रुपयाचे जलसिद्धीकरण बॉटल गावोगावी वाटल्या गेल्या. मात्र प्रत्यक्षात 65 रुपये किंमत असणाऱ्या जलशुद्धीकरण बॉटल नव्वद रुपयात खरेदी केल्या जात आहे. त्यामुळे या गंभीर प्रकाराकडे गटविकास अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
तीन ऑगस्ट रोजी मासिक मीटिंग बोलावली आहे यावेळी मी स्वतः या गंभीर प्रकाराकडे लक्ष देऊन अधिक खर्च केलेल्या रुपयाची चौकशी करतोगोपाल कल्हारेगटविकास अधिकारी ;पंचायत समिती मारेगाव.