राष्ट्रीय महाविद्यालय येथे कायदेविषयक मार्गदर्शन
मारेगाव :- प्रतिनिधी
येथील राष्ट्रीय कनिष्ठ महाविद्यालयात कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश पोटे होते.प्रमुख मार्गदर्शक म्हणून मारेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायलयाचे न्यायाधीश निलेश वासाडे होते.प्रमुख अतिथी म्हणून फौजदार सावंत,ऍड.मेहमूद पठाण.ऍड. आशिष पाटील.ऍड. रामटेके मंचावर होते.
यावेळी अँटी रॅगिंग कायदा.अंमली पदार्थ विरोधी कायदा.ऍसिड अट्याक.विधी क्षेत्रात करिअर.स्पर्धा परीक्षा ची तयारी यावर विस्तृत माहिती दिली. न्यायाधीश निलेश वासाडे यांनी प्रोजेक्टर वर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन द्वारे वाहन कायदा आणि ट्रॅफिक नियम बाबत सखोल अभ्यासपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन प्रा.संतोष चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन प्रा.दिलीप मांडवकर यांनी केले.
कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी प्रा.आनंद गोहोकार.प्रा.किरण पोटदुखे. प्रा.सागोळले इत्यादींनी परिश्रम घेतले.