खळबळजनक...
मारेगाव तालुक्यात बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल
🔸मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी पथकाचा छापा
🔸थेट पश्चिम बंगाल मधून चिंचाळा येथे प्रॅक्टिस
🔸अँलोपॅथी औषधी केली जप्त
तालुक्यातील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर मारेगाव तालुका आरोग्य विभागाने छापा टाकून पोलिसांच्या स्वाधीन केल्याने बोगस डॉक्टरवर दि.४ आँगष्ट रोजी गुरुवारला रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
प्राप्त माहितीनुसार , मारेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना देठे यांना मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे बोगस डॉक्टर प्रॅक्टिस करीत असल्याची माहिती प्राप्त होताच आरोग्य पथकाने छापा टाकला.
प्रणब राधागोविंद मंडल (३०) रा.आसानगर जी.नदीया (पश्चिम बंगाल ) हा बोगस डॉक्टर मागील काही महिण्यापासून तालुक्यातील चिंचाळा येथे प्रॅक्टिस करीत होता.याबाबतची माहिती प्राप्त होताच तालुका आरोग्य विभागाच्या पथकाने छापा टाकला.यात बोगस डॉक्टरकडे Naturopathy & Yoga हे दोन वर्षाचे डिप्लोमा सर्टफिकेट आढळले.यात केवळ योगा करण्याची परवानगी आहे.यासोबत त्यांचेकडे अँलोपॅथी मेडिसीनही आढळल्याने ते नागरिकांच्या आरोग्याशी खेळत फसवणूक करीत असल्याचा आरोग्य विभागाने ठपका ठेवत स्वतः तालुका आरोग्य अधिकारी अर्चना देठे यांनी मारेगाव पोलिसात फिर्याद दाखल केली.
दरम्यान , सदर डॉक्टरला १९६१ कायदा क ३३ अंतर्गत अँलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचा कोणताही अधिकार नसतांना व अँलोपॅथी औषध वापरत प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याने बोगस डॉक्टर प्रणब राधागोविंद मंडल यांचेवर कलम क ३३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात जमादार राजेंद्र चांदेकर , सुंकुलवार करीत आहे.