मारेगाव तालुक्यातील शांततेचे वैभव अबाधित राखा
🔸एसडीपीओ संजय पूज्जलवार यांचे आवाहन
🔸मारेगाव येथे शांतता कमिटीची सभा
मारेगाव : प्रतिनिधी
आगामी सणासुदीच्या काळातील प्रामुख्याने मारेगाव तालुक्यातील शांततेचं गतवैभव कायम ठेवण्यावर भर द्या व सलोखा राखण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील असाल ह्याच अपेक्षा असल्याच्या भावना उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार यांनी प्रतिपादीत केल्या.
ते मारेगाव पोलीस स्टेशन मध्ये गुरुवारला आयोजित शांतता कमिटीच्या सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.या प्रसंगी ठाणेदार राजेश पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
येणारे दिवस सणासुदीचे असून मारेगाव तालुक्यात सामाजिक तथा धार्मिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी संकल्प करून मारेगाव तालुक्याचे गतवैभव कायम ठेवण्यावर भर द्या.तसाही वणी उपविभागच शांततेसाठी प्रसिद्ध असल्याने ही समाधानकारक बाब यावेळी पुज्जलवार यांनी प्रतिपादित केली.
दरम्यान येणाऱ्या काळातील सनाबाबत पोलीस प्रशासन कटाक्ष आहे.मात्र पोलिसांसोबत जागृत नागरिकांनी संयम व शांततेचे व्रत समोर नेण्यासाठी भर द्या अशा अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्षा डॉ. मस्की , डॉ.महाकूलकर , दुष्यंत जयस्वाल , खालिद पटेल , गजानन किन्हेकर , शंकरराव मडावी, तात्याजी चिकाटे यांचे सह बहुतांश नागरिक उपस्थित होते.