दोन युवकांच्या मृत्यूने मारेगावात हळहळ
🔸एकाचा विजेच्या धक्क्याने तर दुसऱ्याची विहिरीत आत्महत्या
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव येथील कान्हाळगाव रोड वर वास्तव्यात असलेल्या एका २७ वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू तर एका कामगाराचा विहिरीत मृतदेह आढळल्याने वेगवेगळ्या तर्काला उधाण आले आहे.सोमवारला दुपारी घडलेल्या या दोन्ही दुर्देवी घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मारेगाव प्रभाग १३ मधील कान्हाळगाव रोडवर वास्तव्यात असलेल्या अनिल चंडकू आत्राम या युवकास स्वतःचे घरी जिवंत विद्युत तारेचा स्पर्श होऊन आज दुपारी ३ वाजताचे दरम्यान मृत्यू झाला.पानटपरी चा व्यवसाय करणाऱ्या अनिल चा विवाह गतवर्षीला झाला होता.अचानक झालेल्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.दरम्यान अनिलच्या पश्चात आई , पत्नी , भाऊ , बहीण असा आप्तपरीवार आहे.तूर्तास अनिलचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव ग्रामीण रुग्णालयात आहे.
दुसऱ्या घटनेत राज्यमहामार्गा शेजारी पूर्वाश्रमीच्या तेलंग यांचे शेतातील विहिरीत मधुकर झिंगट सहारे (३०) रा.सुरतुल्ली ता. देवळी लोहारा जी.गोंदिया या कामगाराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. येथील लोढा हॉस्पिटल चे बांधकामात तो कामगार म्हणून कार्यरत होता.मागील चार - पाच दिवसापासून तो बेपत्ता असल्याची तक्रार मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती.आज दुपारी २.३० वाजताचे दरम्यान त्याचा मृतदेह विहिरीत तरंगतांना दिसला.नेमके आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात आहे.