अपघात...
भरधाव सॅन्ट्रो कारची उभ्या ट्रकला धडक
🔸एक जागीच ठार तर एक शिक्षक व सहकारी मित्र जखमी
🔸निंबाळा सोमनाळा फाट्या नजीक राज्यमहार्गावरील घटना
वणी : संतोष बहादूरे
मारेगाव वरून वणीकडे जाणाऱ्या भरधाव जाणाऱ्या सॅन्ट्रो कार ने उभ्या ट्रकला जबर धडक दिल्याने एक जन जागीच ठार तर मारेगाव तालुक्यातील बुरांडा शेतकरी कृषी विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शनिवारच्या रात्री ९ वाजताचे दरम्यान सोमनाळा फाटा समोर राज्यमहामार्गावर घडली.
मारेगाव तालुक्यातील बुरांडा शेतकरी कृषी विद्यालयातील शिक्षक व सहकारी मित्रा सह एक विद्यार्थी सॅन्ट्रो कार ने शनिवारला रात्री बुरांडा शाळेतून मारेगाव मार्गे वणीकडे प्रयाण करीत असतांना राज्यमहामार्गावरील उभ्या ट्रकला जबर धडक दिली.यात बसलेले अमोल देठे , छोरीया लेआऊट , वणी यांचा जागीच मृत्यू झाला.कार चालक शिक्षक आकाश रामदास लालसरे व मागे बसलेला विद्यार्थी तेजस मडावी जखमी झाले.परिणामी आकाश लालसरे यांचेवर चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर विद्यार्थी मडावी यास वणी येथे प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली.दरम्यान अपघातात मृत्यू झालेल्या अमोल देठे यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.
राज्य महामार्गावर नियमित उभे वाहने अपघातास कारण ठरत असतांना कोणतीही दिशादर्शक संकेत लावत नसल्याने अपघात बळावून वाहनधारकाच्या जीवावर बेतत आहे.यावर पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.