ब्रेकिंग न्यूज...
मारेगाव पंचायत समितीच्या प्रांगणातील हिरव्याकंच वृक्षावर वीज कोसळली
🔸जीवितहानी टळली
मारेगाव : प्रतिनिधी
मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट सुरू असतांना अचानक पंचायत समितीतील प्रांगणात डौलाने उभे असलेला हिरव्याकंच लिंबाच्या वृक्षावर वीज पडून वृक्षाचा काही भाग जळाला.एरवी वृक्षाखाली मानवी थवा कायम राहत असतांना सेकंड सॅटरडे च्या सुट्टी मुळे मोठी हानी टळली.सदरील घटना आज दि.९ जुलै ला दुपारी १.३० वाजताचे दरम्यान घडली.
मागील तीन दिवसांपासून पावसाने तालुक्यात थैमान घातले आहे.अनेक ठिकाणी संततधार पावसाने शेती सह नागरिकांचे जनजीवन प्रभावित झाले आहे.दरम्यान आज दुपारी मारेगाव शहरात मुसळधार पावसासह विजेचा कडकडाट सुरू झाला.शंभर पेक्षा जास्त गती असलेल्या विजेची चकमक थेट मारेगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारच्या डाव्या बाजूला असलेल्या लिंबाच्या वृक्षावर कोसळली.यात लिंबाचा काही भाग जळाला आहे.
परिणामी , एरवी प्रशासकीय कार्यालयात नेहमीच मानवी थव्याची याच वृक्षाखाली तोबा गर्दी असते मात्र आज सेकंड सॅटरडे असल्याने कार्यालयास सुट्टी आहे. त्यामुळे घडलेला प्रसंग मोठी जिवीतहानी टाळून गेली.दरम्यान हा हिरवाकंच महाकाय वृक्ष वीज पडल्यामुळे कालांतराने सुकेल तर नाही ना ? अशी भिती वृक्षप्रेमीत व्यक्त होत आहे.