Type Here to Get Search Results !

मारेगाव तालुक्यातील बेंबळाचे कालवे फुटले

अनास्थाजनक....

मारेगाव तालुक्यातील बेंबळाचे कालवे फुटले

🔸चुकीच्या कामाचा  शेतकऱ्यांना जबर फटका
🔸९० हेक्टर शेतजमीन खरडली
🔸संतप्त शेतकऱ्याकडून कारवाईची व मोबदल्याची मागणी
मारेगाव : कैलास ठेंगणे
मारेगाव तालुक्यातील कुंभा व मार्डी परिसरामध्ये बेंबळा प्रकल्पाची कामे चुकीचा पद्धतीने करण्यात आली. त्यामुळे मागील दोन दिवसापासून संततधार पावसामुळे कालव्यातील पाणी अनेक शेतकऱ्याचे शेतात शिरल्यामुळे ९० हेक्टर क्षेत्रफळातील शेत जमीन पिकासह खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. याबाबत महसूल सह बेंबळा प्रकल्पाचे अभियंता गंभीर दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
      
तालुक्यातील कुंभा, सिंधी,गदाजी ,(बोरी ) कोथूर्ला, पहापल, देवाळा, डोंगरगाव , चोपण , बामरडा , किन्हाळा , मार्डी , वडगाव , महागाव सह  बेंबळा प्रकल्पाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. या प्रकल्पाच्या सदोष कामामुळे ९० हेक्टर शेत पिकासह जमीन खरडून गेली तर पाच हेक्टर क्षेत्रफळाचे नाल्याच्या पुरामुळे प्रचंड नुकसान झाले. बेंबळा प्रकल्पाच्या अभियंत्याने मनमानी पद्धतीने कामे केली मात्र सहा सात जुलै रोजी तालुक्यात झालेल्या संततधार पावसामुळे ९० हेक्टर वरील शेत जमीन खरडून गेल्याचा प्राथमिक अहवाल महसूल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे  तालुक्यातील तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांना फटका बसला असून महसूल सह बेंबळा प्रकल्प अधिकारी हलगर्जीपणा करीत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे.

नुकसान झालेला घटनास्थळ गाठत परिस्थितीचा प्रत्यक्षात आढावा घेतला.तात्काळ नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठ्यांना निर्गमित केले असून शक्य तेवढ्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे सूतोवाच विदर्भ सर्च न्यूज ला तहसीलदार दीपक पुंडे यांनी केले

दोन दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरू असून अवघी ३० मि. मी. पाऊस पडल्याची नोंद प्रशासकीय दप्तरात झाली.दरम्यान , तालुक्यामध्ये बेंबळा प्रकल्पाच्या कामाचा फटका शेतकऱ्यांना बसल्याची माहिती मिळताच तहसीलदार दीपक पुंडे सह बेंबळा प्रकल्प अधिकारी , मंडळ अधिकारी ऑन फिल्ड झाले. त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत पंचनामा करण्याचे आदेश दिले.

नुकसान झालेल्या ठिकाणी मी प्रत्यक्षात हजर होतो.विदारक परिस्थितीने मन हेलावून गेले.तात्काळ शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी स्वतः प्रयत्नशील आहे.लवकरच मदतीचा ओघ पिडीत शेतकऱ्यांच्या पदरी पाडू.
श्रीकांत मस्कावार
कार्यकारी अभियंता
बेंबळा प्रकल्प , यवतमाळ
      
आधीच दुबार तीबार पेरणीने मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना आता प्रकल्पाचा जबर फटका बसला असून यास जबाबदार असणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवरच कारवाई करण्याची मागणी पिडीत शेतकऱ्यांकडून केली जात आहे.परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचा ओघ निर्माण करावा अशीही मागणी होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies