Type Here to Get Search Results !

धक्कादायक...२०० हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली

धक्कादायक...

२०० हेक्टर जमिनीतील पिके पाण्याखाली

🔸चिंचमंडळ , दापोरा परिसरात पूरसदृश स्थिती
🔸शेकडो शेतकऱ्यावर अस्मानी संकट
हेडलाईन च्या खाली
🔸बेंबळा चे १३ दरवाजे उघडले
🔸बेंबळाने आणले नदी , नाले शेतीसह शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

मारेगाव : प्रतिनिधी
सततच्या पावसाने सर्वत्र शेतजमिनीची अवस्था होत्याची नव्हती झाली आहे.अशातच आज झालेल्या पावसाने दापोरा पुलावरून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असतांना या परिसरातील किमान २०० हेक्टर शेतजमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहे.प्रचंड नुकसानीला सामोर जाणाऱ्या शेतकऱ्यांची स्थिती बिकट होत आहे.दरम्यान शेत जमिनीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाल्याने तात्काळ सर्वेक्षण करून मदतीचा हात देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दिवाकर सातपुते यांनी केली आहे.
     
मागील दोन दिवसांपूर्वी उसंत घेतलेल्या पावसाने कालपासून पुन्हा मुसंडी मारली.अनेकांच्या शेतातील पिके उध्वस्त होत असतांना शेतकऱ्यांच्या मागावर अस्मानी संकट कायम आहे.आठवडा पूर्वी चक्क बेंबळा प्रकल्पाचे कालवे फुटल्याने शेकडो शेतकऱ्यांची शेती खरडून गेली , पिकेही पूर्णपणे निकामी झाल्याने तूर्तास उत्पादनात आतापासून घट होण्याची संभाव्य शक्यता वर्तविली जात आहे.
हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाण्याची भीती
चिंचमंडळ परिसरात दोनशे हेक्टर वरील पिके  तूर्तास पाण्याखाली आहे.बेंबळा प्रकल्पाचे १३ दरवाजे उघडल्याने ही शेतकऱ्यावर बेंबळा प्रशासनाने नामुष्की ओढवली.सन १९९४ मध्ये आलेल्या महापुराने परिसरातील गावेच उद्धस्त केली होती.त्याच तोडीचा महापूर होण्याची संभाव्य शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविली जात आहे.असे झाल्यास हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
परिणामी कालपासून सलग येत असलेल्या पावसाचा जोर कायम असतांना दापोरा पुलावरून किमान सहा फूट अंतरावरून पाणी वाहत आहे.येथून येणारी दुतर्फा वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. चिंचमंडळ , दापोरा , बोरी , खैरी व कोसारा येथील उभ्या पिकांच्या जमिनीवर पाण्याने ताबा घेतला आहे.तूर्तास कपाशी व सोयाबीनची ची पिके किमान २०० हेक्टर वरील जमीन पाण्याखाली आहे.त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या फटका बसत आहे.अस्मानी व सुलतानी संकट शेतकऱ्यांच्या मागावर असतांना शेतकऱ्यांची स्थिती नाजूक अवस्थेकडे वाटचाल करीत आहे.अतिवृष्टीमुळे मारेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका कायम आहे.मात्र प्रशासनाकरवी नुकसानीचा मोबदला केवळ मार्डी व बोटोणी करिता देण्यात आला.यातून मारेगाव , नवरगाव , गौराळा विभाग वगळण्यात आला होता. पूर्ण मारेगाव तालुक्यातीन फेर सर्वेक्षण करून सरसकट मोबदला देण्यात यावा अशी आर्त हाक व मागणी येथील शेतकऱ्यांची आहे.

 तात्काळ पंचनामे करून मदत द्या

आजमितीला शेकडो हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली असतांना शेतकरी कमालीचे हवालदील झाले आहे.आर्थिक परिस्थितीही मेटाकुटीस आली असतांना अस्मानी संकट शेतकऱ्यांच्या तोंडातील घास पळवून लावत आहे.याची गांभीर्याने दाखल घेवून चिंचमंडळ परिसरात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत प्रदान करावी.अन्यथा जनआंदोलन उभारण्याचा गर्भित इशारा सामाजिक कार्यकर्ते दिवाकर सातपुते यांनी दिला आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Hollywood Movies