आत्महत्येची धग ....
धरमपोड येथील युवकाची विष प्राशन करुन आत्महत्या
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील सिंधी (महागाव) एका २७ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल १७ जुलै रोजी सायंकाळी ८ वाजता सुमारास घडली.
रवींद्र बळीराम आत्राम रा. धरमपोड ,वय २७ वर्ष असे मृतक विवाहित युवकाचे नाव आहे. तो सिंधी (महागाव )येथे शेतमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. त्याची पत्नी गर्भवती असल्यामुळे ती माहेरी गेली होती. यादरम्यान काल सायंकाळी त्याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन केले. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येत असताना मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले . मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला तात्काळ चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. माञ उपचारादरम्यान त्याचा १७ जुलै च्या रात्री मृत्यू झाला.त्याचा मृत्यू चे नेमके कारण कळू शकले नाही. मागील काही महिन्यात तालुक्यात होणाऱ्या सतत आत्महत्याने चिंता व्यक्त केली जात आहे.