बोटोणी नजीक १०२ ला अपघात
🔸चालक जखमी , यवतमाळ हलविले
बोटोणी : सुनील उताणे
प्रसूती वाहन असलेले (१०२) अँम्बुलन्स शनिवारच्या मध्यरात्री अपघातग्रस्त झाल्याने चालक जखमी झाल्याची घटना बोटोणी नजीक घडली.
मारेगाव ग्रामीण रुग्णालयातील प्रसूती रुग्णासाठी असलेली १०२ वाहन यवतमाळ येथून परत येत असतांना जंगली प्राणी वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटून रस्त्याच्या कडेला कोलांटउड्या घेतल्याची घटना शनिवारच्या मध्यरात्री बोटोणी नजीक घडली.
सदर अपघातात चालक राजकीरण राठोड (३२) हे जखमी झाले आहे.त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.तूर्तास त्यांचेवर यवतमाळ येथील रूग्णालयात उपचार सुरू आहे.