आत्महत्येची धग ....
महादापेठ येथील युवकाची विष प्राशन करुन आत्महत्या
मारेगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील मच्छिंद्रा जंगलातील वाघोबा देवस्थान जवळ एका २७ वर्षीय युवकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना ६ जुलै रोजी सायंकाळी सुमारास घडली.
रमेश किसन पावनकर रा. महादापेठ(कुंभा) असे मृतक युवकाचे नाव आहे. तो आज सकाळी घरून कामानिमित्त बाहेर गेला होता. मात्र सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान मच्छिंद्र जंगलातून काही शिक्षक जात असताना त्यांना तो निपचित पडून असल्याचे दिसला. त्यांनी तात्काळ त्याला वणी येथे उपचारार्थ नेत असतांना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याचा मागे आई वडील भाऊ असा आप्त परिवार आहे. त्याचा मृत्यू चे नेमके कारण समजू शकले नाही.