दिलासादायक..
तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करा
🔸तहसीलदार दीपक पुंडे यांचे कर्मचाऱ्यांना आदेश निर्गमित
मारेगाव : प्रतिनिधी
मारेगाव तालुक्यात मागील काही दिवसापूर्वी अतिवृष्टी झाली. तत्पुर्वी बेंबळा कालवे फुटून शतेजमीन खरडून गेली .या दरम्यान काही प्रकल्पाचे दरवाजे उघडल्या गेल्यामुळे वर्धा नदी किनारी असणाऱ्या गावांना पुराचा जबर फटका बसला. यात शेकडो हेक्टर जमीन खरडून गेली. या सर्वांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहे.
मारेगाव तालुक्यातील पाचही महसुली मंडळामध्ये पावसाने हाहाकार माजविला आहे. त्यामुळे अनेक घराची पडझड झाली असून शेत जमीन पाण्याखाली आली आहे. यात भरीस भर म्हणून बेंबळा प्रकल्पाचे दरवाजे उघडल्या गेली. त्यामूळे वर्धा नदी किनारी वसलेल्या सवागी, दापोरा, चिंचमंडळ, दाडगावं, वनोजा देवी, गदाजी बोरी , शिवनी धोबे, सह आदि गावामध्ये पुराच्या पाण्याने अतोनात नुकसान झाले. काही घराची पडझड झाली. तर शेतकऱ्याची खते पाण्यात विरघळली . या दरम्यान बेंबळा प्रकल्पाचा चुकीचा काम करण्याचा पद्धतीने ठिकठिकाणी कालवे फुटल्याने शेत जमीनी सह पिके खरडून गेली. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता आर्थिक मेटाकुटीस आला आहे . या घटनेची गंभीर दखल घेत काल २०जुलै रोजी तहसिल कार्यालयात सर्व विभागातील कर्मचारी, मडळअधिकारी,ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांची बैठक घेऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. यावेळीतहसीलदार दीपक पुंडे , गटविकास अधिकारी गोपाल कलारे, तालुका कृषी अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अर्चाना देठे यांची उपस्थिती होती.